ब्रेकफास्ट न्यूज : उषा नाडकर्णी यांचा 'बिग बॉस'मधील अनुभव कसा होता?

राजेशने त्याच्या थोड्या लिमिट्स क्रॉस केल्या हे बाहेर आल्यावर मला वाटतंय, अशी प्रतिक्रिया बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडलेली अभिनेत्री रेशम टिपणीसने दिली आहे. बिग बॉसच्या आत्तापर्यंतच्या प्रवासात रेशम टिपणीस चांगलीच चर्चेत राहिली होती. मग ते राजेश शृगांरपुरेसोबतची रिलेशनशिप असो वा मेघा-सईसोबतचं टशन, तिला चाहत्यांचा कायमच पाठिंबा मिळाला. परंतु बिग बॉसचा खेळ आता अंतिम टप्प्यात आला असताना रेशम टिपणीसची यातून एक्झिट झाली आहे. यावेळी तिने राजेशसोबतच्या अफेअर्सच्या चर्चांसह टास्कबद्दल गप्पा मारल्या.